Uncategorized

आझाद समाज पार्टी व भिम आर्मीच्या वतीने उप.विभागीय अधिकारी यांना दिले निवेदन,,,,

उमरखेड दिनांक 15/मे गो. सी. गावंडे सन्मान पत्रकाराचा या कार्यक्रमात संविधानाच्या प्रतिची छेडछाड करुन विटबंना करणाऱ्या गोपिकाबाई सिताराम गावंडे संस्थेच्या अध्यक्ष सचिव व आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करणे

, दिनांक २९/४/२०२५ रोजी गोपिकाबाई सिताराम गावंडे कॉलेज मध्ये सन्मान चौथ्या स्तंभाचा कार्यक्रमामध्ये संविधानाच्या पुस्तकाचे वाटप केले परंतू, संविधानाच्या प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीच्या पेजवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो छापून स्वतःचा प्रचार करण्यासाठी संविधानाची छेडछाड करण्यात आली आहे.

यानंतर सर्व संविधान प्रेमी तथा विविध आंबेडकरवादी पक्ष आणि संघटना यांच्यात तिव्र संतापाची लाट उसळली. त्यानंतर पोलिस प्रशासनाने गोपिकाबाई सिताराम गावंडे विद्यालयाचे प्राचार्य. एम.बी.कदम व केंद्र सहयोजक बी.यु.लाभशेट्टवार यांच्यावर गुन्हा दाखल केलाआहे.

परंतू, या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य मार्गदर्शक असणाऱ्या अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल भारतीय कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष व सचिव व सर्व संचालक मंडळावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही करण्यात आली नाही.भारत देश हा संविधानावर चालतोआहे.

त्यामुळे भारतीय संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही. गोपिकाबाई सिताराम गावंडे विद्यालयाने भारतीय संविधानाचा केलेला अपमान ही पुरोगामी महाराष्ट्राला अशोभणीय बाब आहे.

घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संविधानप्रेमी जनतेत संतापाची लाट उसळली असून यात दोषी असणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने आठ दिवसांच्या आत कार्यवाही करुन त्यांना अटक करावी. अन्यथा, आझाद समाज पार्टी व भिम आर्मीच्या वतीने गोपिकाबाई सिताराम गावंडे विद्यालया समोर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. याची पोलिस प्रशासनाने नोंद घ्यावी.प्रतिलिपी :- मा. उपविभागीय पोलिस अधिकारी, उमरखेड

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!