योग्य नियोजनासाठी आ. किसन वानखडेंचा विधानसभेत प्रश्न इसापूर प्रकल्पाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडा

✒️ बबलू भालेराव (मुख्य संपादक)
✒️ सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)
उमरखेड :- (दिनांक २० डिसेंबर) इसापूर धरणाचे पाणीपैनगंगा नदीपात्रासहकालव्याव्दारे सोडण्याचे योग्यनियोजन नाही.

हिवाळ्यातचपैनगंगा आटल्याने नदीकाठच्यागावांना पाणीप्रश्नाचा सामनाकरावा लागतो आहे. त्यामुळेनदीपात्रात पाणी सोडण्याचे योग्य नियोजन व्हावे अशी मागणी उमरखेडचे आ. किसन वानखडे यांनी हिवाळीअधिवेशनात सभागृहात केली.इसापूर सिंचन प्रकल्पाचेपाणी सोडण्याबाबतप्रशासनाकडून योग्य नियोजनहोत नाही.

दरवर्षी नदीकाठच्याशेतकऱ्यांचे पाणीटंचाईमुळेबेहाल होतात. त्यामुळे प्रकल्पाचेपाणी पैनगंगा पात्रात योग्यनियोजन करून सोडावे, हाशेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दानवनिर्वाचित आ. वानखेडे यांनीविधानसभेत उपस्थित केला.हिवाळ्यापासूनच खेडेगावातनागरिकांना पिण्याच्या पाण्याचेदुर्भिक्ष निर्माण झाले आहे.

शेतातील ऊस यासह रब्बी पिकेवाळून जातील अशी भीती आहे.पशुधनही पाण्यावाचून आक्रोशकरीत आहेत. ही परिस्थितीगतवर्षी भाजपाचा एक सामान्यकार्यकर्ता म्हणून वानखडे यांनीमांडली होती.

आपल्या कार्यकर्त्यांसह नदीकाठावरील गावामध्ये जाऊनवाळलेल्या पिकांची पाहणी केली होती. त्यावरून त्यांनी १७ डिसेंबर रोजी विधानसभेतीलअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीशेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दामांडून आपल्या पंचवार्षिक कार्यकाळाचा प्रारंभ केला आहे.
