आरोग्यकृषी धनमहाराष्ट्रमानवतविशेषसामाजिक

महाराष्ट्रात होत असलेल्या हत्या थांबवून त्या विरुद्ध कठोर कारवाई करा..!

(रयत क्रांती संघटनेची मागणी ; मागण्याचे निवेदन तहसील प्रसासनास सादर)

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत:- (दिनांक ०२ जानेवारी)महाराष्ट्रात होत असलेल्या सततच्या हत्या थांबवून त्या विरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी रयत संघटनेचा वतीने ०१ जानेवारी रोजी मानवत तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान विचारांचा आणि वीरतेचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, सध्या हत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे अतिशय दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारे आहे.

बिड येथील संतोष देशमुख यांच्या झालेल्या दुर्दैवी हत्येचा रयत क्रांती संघटनेचा वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

अशा घटना समाजात अस्वस्थता पसरवणाऱ्या आहेत आणि त्या कोणत्याही परिस्थितीत सहन करता येणार नाहीत महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाला आमची ठाम मागणी आहे की, हत्यां सारख्या घटनांना तात्काळ आळा घालण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत अशा गंभीर गुन्ह्यांना जबाबदार असलेल्या आरोपींना जलदगती न्याय प्रक्रियेद्वारे फाशीची कठोर शिक्षा द्यावी जेणे करून समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा ठाम संदेश पोहोचेल रयत क्रांती संघटना या प्रकारच्या घटनांना पूर्ण पणे विरोध करते,

महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटीबद्ध राहील आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुन्हा एकदा शांततेचा, सौहार्दाचा आणि न्यायाचा आदर्श बनवू असे यावेळी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर आवचार, जिल्हाउपाध्यक्ष परमेश्वर नाना घाटुळ, शाखा प्रमुख जनार्धन आवचार, सोपान आवचार, संतोष आवचार, रामेश्वर साबळे, अंकुशराव बारहाते, शाम कबले, गोपाळ शिंदे, गोविंद बोबडे, भगवान आवचार, शिवाजी आवचार, दिनेश आवचार यांची उपस्थिती होती.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!