महाराष्ट्रमानवतविशेषशहर

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पिकविमा व अतिवृष्टीचे नुकसान भरपाई जमा करण्याचे आदेश द्यावे

(मानवत तालुका शेतकरी सुकाणू समितीची तहसीलदार यांच्याकडे मागणी)

✒️बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

✒️प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत:- (दिनांक २७ डिसेंबर) अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पिकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा करण्याचे आदेश प्रसाशनाने संबंधीत विभागाला द्यावे अशी मागणी मानवत तालुका शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी मागणीचे निवेदन मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना २६ डिसेंबर रोजी देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ३१/०८/२०२४ व दि. ०१/०९/२०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीने मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांचे नदी-नाल्याच्या पुराच्या पाण्याने व अतिपावसाने अतोनात नुकसान झाले होते.

दि. २० /०९ /२०२४ रोजी मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांनी मानवतरोड येथे रास्ता रोको करुन अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पिकविमा, कर्जमाफी या मागण्याकडे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला होता.

एक महिन्यात पिक विमा व नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले मात्र तीन महिने उलटून देखील आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा पिकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई खात्यात जमा झालेली नाही. तसेच शेतकयांच्या खात्यावर, कापुस, सोयाबिन, तुरीचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावा.

आणि K.Y.C केलेल्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीची नुकसान भरपाई तात्काळ जमा करण्यात यावी. अतिवृष्टी ग्रसत शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करण्यात यावी.

आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या असून मागण्यांची पुर्तता ०६ जानेवारी २०२५ च्या आत करण्यात यावी अन्यथा त्या दिवशी पासून तहसिल कार्यालय मानवत वर धरणे आंदोलन किंवा मोर्चा घेराव सारखे तीव्र आंदोलन मानवत तालुका शेतकरी स्काणू समितीच्या वतीने करण्यात येईल.

असा इशारा हि निवेदनाद्वारे दिला असून निवेदनावर कॉ. लिंबाजी कचरे, कॉ. विष्णू जाधव, कॉ.आसाराम दुधे, गोविंद घांडगे, दशरथ शिंदे, दत्तराव शिंदे, कॉ. रमेश साठे, बालासाहेब आळणे, संजय देशमुख, यांच्या सह शेतकऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!