पिरंजी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण निमित्त आदरांजली वाहिली
महापरिनिर्वाण दिन
पिरंजी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण निमित्त उपासक उपासिकांनी आदरांजली वाहिली…!
✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518
✍️ सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड :- दिनांक 6 डिसेंबर पिरंजी येथे भीमराज मित्र मंडळाच्या वतीने ठीक आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण निमित्त पुतळ्याला हर अर्पण करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य संतोष भावाळ व पुतळा समितीचे अध्यक्ष सखारामजी धुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा भिम शाहीर तथा ग्रामपंचायत सदस्य देवानंद पाईकराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनावर प्रेक्षकांना मार्गदर्शन केले,

त्यानंतर सार्वजनिक जिक रित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी ठीक सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे कॅन्डल मार्च काढण्यात आले बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्म शरणम् गच्छामि, संघ सरणंग गच्छामि या सुरामध्ये बुद्ध वाड्यातील लहान बालक व बालिका सर्व रामा माता महिला मंडळ महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.

माजी सैनिक मधुकर दवणे, माजी सरपंच अनंतराव पाईकराव, पीरंजी गावचे ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ दवणे, प्रकाश पाईकराव, लक्ष्मण सावते, संजू पाईकराव, सुदर्शन कांबळे, प्रभाकर पाईकराव, देवानंद रोकडे सर, उत्तम पंडित,मल्हारी दवने, विठ्ठल शेळके, उत्तम झिंजाडे ,साऊंड सिस्टिम च्या माध्यमातून सहकार्य करणारे गंगाराम दवणे,संदीप धूळे, श्रीपाल पाईकराव धम्मपाल पाईकराव, अविनाश पाईकराव, अमोल पाईकराव, इंद्रजीत पाईकराव, रामभाऊ पाईकराव, व भीमराज मित्र मंडळाची सर्व टीम, ने कॅन्डल मार्च मध्ये सहभाग घेतला होता.

ही मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाले शाळेपासून बिरसा मुंडा चौक या ठिकाणी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले, त्यानंतर, झोपडपट्टी येथील पंचशील झेंड्याला अभिवादन करून, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पिरंजी ग्रामपंचायत चे उपसरपंच शंकर दादा सूळ व सकाराम धुळे, आणि देवानंद रोकडे सर यांनी अभिवादन केले होते.

👍

भाषणे झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहन बक्षीस म्हणून भीमराज मित्र मंडळाच्या वतीने वही आणि पानांचे वाटप करण्यात आले होते. त्या नंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले होती. शाहीर देवानंद पाईकराव यांनी श्रद्धांजली गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
