खडकवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान

(नुकसनीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी)
✍🏻प्रविण घागरे(मानवत / प्रतिनिधी)

मानवत दि.७ जून रोजी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे मानवत तालुक्यातील मौ. खडकवाडी येथे नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे तसेच मोठ मोठी झाडे उन्मळुन पडत पशुधनाला ही इजा झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सदरील घटनेचा जाय मोक्यावर जाऊन तहसील प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांतुन केली जात आहे.

झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब व तारा तुटून पूर्ण गावाचा विदयुत पुरवठा खंडित झाला वादळी वाऱ्यामुळे येथील सुदाम पुरी, नवनाथ भारती, सुदाम पुरी, लक्ष्मण भारती, दसरथ मसलकर भागवत भारती, यांच्या सह अनेक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती यांनी सदरील घटनेची पाहणी करून मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याशी संपर्क साधत घटनेचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी यावेळी केली.
