मानवत गट साधन केंद्रात चला उधळूया – रंग वाचनाचे कार्यक्रम संपन्न

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक १६ फेब्रुवारी) मानवत येथील गट साधन केंद्रात चला उधळूया – रंग वाचनाचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बालकांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत, वाचलेल्या पुस्तकावर गप्पा कराव्यात, वाचनाचे विविध अनुभव सांगावेत, वाचनाचे फायदे सांगून वाचन संस्कृती अधिकाधिक वाढण्या साठी नेमकं काय केलं पाहिजे या वरील त्यांची मते, उपक्रम जाणून घेणारा, त्यांना अभिव्यक्त होण्याची संधी देणारा लेखनपीठ वाचनपीठ उपलब्ध करून देणारा कार्यक्रम म्हणजेच ‘चला उधळूया – रंग वाचनाचे या अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राच्या अफलातून उप क्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे,

त्याचाच एक भाग म्हणजे चालता बोलता वाचनावर गप्पा सदरील कार्यक्रम हा गट साधन केंद्र मानवत येथे बुधवार रोजी संपन्न झाला बाल कवींचे कवी संमेलन, नाटिका ‘मला भावलेलं पुस्तक ‘ यावर गट चर्चा व मानवत तालुक्यातील पुस्तक वाचन स्पर्धेतील सहभागी बालवाचकापैकी निवडक ८१ बालवाचकांचा सन्मान सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ भेट देऊन केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मानवतचे गटशिक्षणाधिकारी श्री. मनोज चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख श्री. प्रकाश मोहकरे हे होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक श्री. राजेंद्र शिंदे तर प्रस्ताविक मुख्य प्रवर्तक श्री. विनोद शेंडगे यांनी केले व आभार उत्कृष्ट व्याख्याते तथा शिक्षण तज्ज्ञ शिक्षक श्री. बलभीम माथेले यांनी मानले.
सदरील कार्यक्रम यशस्वी तेसाठी श्री. विलास मिटकरी, श्री. राजेश चव्हाण, श्री. राजकुमार गाडे, श्री. सोनय्या कीर्तनकार, श्री. नामदेव खिळदकर, श्री. करण दुधाळ, श्री. कस्तुरे, श्री. देशमुख, श्री. विकास जुक्टे यांनी प्रयत्न केले.
