Uncategorized

वेस्ट बंगाल येथे राष्ट्रीय पुरस्कार प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांना प्रधान

✍️सिध्दार्थ दिवेकर [उपसंपादक मो.9823995466]

महाराष्ट्र:- (दिनांक 27 ऑक्टोंबर) भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ दिल्लीच्या वतीने भारतातील सामाजिक समता या विषयावर सिलिगुडी ,पश्चिम बंगाल येथील डॉ . आंबेडकर अकॅडमी येथे पार पडलेल्या आठव्या राष्ट्रीय परिषदेत मुळावा येथील मराठी विभाग प्रमुख तथा प्रख्यात साहित्यिक प्रो डॉ.अनिल काळबांडे यांना ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय जीवनगौरव ‘पुरस्कार
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

या परिषदेचे उद्घाटन डॉ. आंबेडकर अकॅडमी चे प्रमुख विष्णू तामण गोले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्रख्यात साहित्यिक डॉ . अशोक कुमार पगारिया या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाणीघाटा येथील समाजसेवक इंजिनिअर सुरजसिंग होते .तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ .अनिल काळबांडे,उद्योगपती राजीव बनकर, मुख्य संयोजक गौरव साठे, विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष वसंतराव दयाली ‘ एडवोकेट सोमनाथ ब्रह्मगुंडे ,समाजसेवी पुरणकुमार लोहार , गोवा येथील धनंजय डांगळे उपस्थित होते.

यावेळी आसाम , नेपाळ , महाराष्ट्र , वेस्ट बंगाल या राज्यातून आलेल्या 28 लोकांना विविध महापुरुषांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .प्रा. अनिल काळबांडे यांच्या शैक्षणिक सामाजिक योगदानाबद्दल त्यांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र , तेथील राज्याचा शेला देऊनसन्मानित करण्यात आले . देश विदेशामध्ये महामानवांच्या विचाराचा त्याचबरोबर मराठी साहित्याचा प्रसार आणि प्रसार करणारे डॉ . काळबांडे यांना याहीपूर्वी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी सामूहिक त्रिशरण सह पंचशीलही प्रदान करण्यात आले . या कार्यक्रमासाठी विश्वकर्मा समाज मंडळ , मनीकुमार सोमवर देविका सोमवर त्याचबरोबर तेथील सामाजिक संघटनेने सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय स्वयंसेवी संस्थेची महासंघाचे मुख्य आयोजक प्रा . गौरख साठे यांनी करून सामाजिक समते शिवाय देशाचा विकास होणार नाही त्यासाठी या परिषदेचे आयोजन केल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली . तर यावेळेस विश्वकर्मा समाज मंडळाच्या वतीने सुद्धा डॉ . काळबांडे यांचा गौरव करण्यात आला यावेळेस बोलताना डॉ . काळबांडे म्हणाले ‘शिक्षणाशिवाय कुठल्याही समाजाचा विकास होणार नाही त्यासाठी शिक्षण हेच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन करून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी निवडून देण्यासाठी वेस्ट बंगाल येथील लोकांचा फार मोठा सहभाग आहे त्यामुळे त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून आल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार जिवनकुमार विश्वकर्मा यांनी मानले कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला . ( सोबत फोटो डॉ . काळबांडे पुरस्कार स्वीकारताना )

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!