राष्ट्रीय महामार्ग ते मानवत शहर जोडणारा सावता माळी रस्ता कामाचे उद्घाटन

✍️प्रविण घागरे (मानवत/परभणी प्रतिनिधी)

मानवत शहर व राष्ट्रीय महामार्ग या दोन्हींना जोडणारा संत सावतामाळी रस्ता बऱ्याच दिवसापासून खचला होता हा रस्ता करण्यात यावा ही मागणी नागरिकांची प्रलंबित होती त्याच अनुषंगाने २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता या रस्त्याचे उद्घाटन मानवत शहराचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते पार पडले.

मानवत शहराच्या बाजूने गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ ला मानवत शहरास जोडणारा सावता माळी रस्ता हा काही वर्षापूर्वी केला होता.
या परिसरात काळ्या मातीची जमीन असल्याने रस्ता खचून जात गेला , वारंवार भेगा पडत होत्या. त्यामुळे दळणवळण करणाऱ्या स्थानिकांना याचा मोठा त्रास होत होता. याच कारणाने सातत्याने हा रस्ता नवीन करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी युवा नेते डॉ.अंकुश लाड यांचे कडे केली होती. शासनस्तरावर पाठपुरावा करत या कामासाठी डॉ. लाड यांनी निधी उपलब्ध करून घेतला व त्या कामाचा २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता रीतसर उद्घाटन करण्यात आले.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूने आर सी सी नालीचे बांधकाम व रस्त्याचे काम होईल. अत्याधुनिक पद्धतीने हा रस्ता होत असल्याने आता रस्ता खचने, तुटणे, भेगा पडणे अशी समस्या या पुढे उद्भवणार नाही याची दक्षता या कामात घेतली जाणार आहे. मानवत शहरातील अत्यंत वर्दळीचा हा रस्ता पूर्ण होत असल्याने परिसरातील सर्व नागरिकांनी
या वेळी आनंद व्यक्त केला तसेच यावेळी नागरिकांनी यथोचित सत्कार डॉ. अंकुश लाड यांचा केला या कार्यक्रम प्रसंगी जिनिंग महासंघाचे अध्यक्ष गिरीश कत्रुवार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक बाळासाहेब मोरे, सुरेश काबरा, गणेश कुमावत, दत्ता चौधरी, विनोद रहाटे, शिवा चांडक, अभिषेक आळसपुरे, शिवाजीराव पाटील, प्रा. डॉ. विश्वनाथ कोक्कर, बळीभाऊ रासवे, बबन राऊत, नारायण रासवे, विश्वनाथ गाढवे, दीपकराव येडे,

बबलू रासवे, दिलीप खेत्री, विठ्ठलराव रासवे, ज्ञानेश्वर रासवे, नरहारी धुमाळ, सोपान वाघमारे, श्रीधर कोक्कर, मनोज राऊत, गोविंद रासवे, भिकाजी रासवे, प्रल्हाद रासवे, मधुकर रासवे, उद्धव रासवे, संतोष पवार, दिगंबर धुमाळ, संतोष घाटुळ, शामभाऊ चौधरी, गणपत सिसोदिया, पप्पू शिंदे, विठ्ठल बारहाते, लखन तिर्थी, भागवत शिंदे, राजाभाऊ राऊत, बाबाजी ठाकूर, मुंजा राऊत, संतोष दुरटकर, डॉ. रामकिशन इक्कर , डॉ. विजय कुमार कहेकर , परमेश्वर भरकड, दीपक होंडे, ओम निर्वळ, बालाजी रासवे,

आकाश रासवे, भास्कर रासवे, विठ्ठल मगर, अनिल घाटूळ, सचिन चौधरी, हनुमान चौके, विजय रासवे, माऊली काठोळे, उद्धव साखरे, राहुल भदर्गे, बळीराम माने, भारत उक्कल कर, ओम राऊत, माऊली कदम, अंगद साखरे, चैतन्य रासवे, अमोल चौधरी, उद्धव रासवे यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
