ऐन उन्हाळ्याच्या तोंडाला नागरिकांची पाण्यासाठी धावपळ
🚨(वीज बिल न भरल्यामुळे पाणीपुरवठा विहिरीचे कनेक्शन कट)

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बाळदी येथे ऐन उन्हाळ्याच्या तोंडालाच पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करायची वेळ आली आहे. कामधंद्याचे दिवस असल्यामुळे तांडा वस्तीत मजूर वर्ग कामावरून येऊन पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातानात फेऱ्या मारताना दिसत आहेत. अजून तर पुढे खूप दिवस बाकी आहेत. यानंतरचे हाल काय होणार हा चिंतेचा प्रश्न पडत आहे. मागील पाच-सहा दिवसापासून गावातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे. भर पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याची टंचाई भासली नव्हती परंतु विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) बिल न भरल्यामुळे त्यांनी पाणीपुरवठा विहिरीचे लाईट कनेक्शन तोडले. त्यामुळे तांडा वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाला आहे. काही ठिकाणचे हातपंप सुद्धा मोडलेल्या अवस्थेत आहेत तेव्हा नेमकं पाणी आणायची तरी कुठून ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

जल जीवन मिशन योजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, गावातील पाण्याच्या टाक्याचे कामही पूर्ण झालेले नाही काही घरी नळाचे कनेक्शन सुद्धा गेलेले नाही.हे काम कधी पूर्ण होणार यावर ग्रामपंचायत काय निर्णय घेणार याकडे सर्व तांडा वस्तीतील लोकांचे लक्ष वेधले आहे.

चौकट: पाणीपुरवठा विहीर चे बिल जवळपास एक लाख 51 हजार एवढे आहे. लोकांकडे वसुली जवळपास आठ लाख रुपये एवढी असून अंदाजे वीस हजार गोळा झाली. लोकांनी पाणीकर भरावा. आम्ही लगेच लाईट बिल भरून पाण्याची व्यवस्था करू असे गावातील सरपंच यांनी सामाजिक कार्यकर्ता आतिश वटाणे यांना भ्रमणध्वनीवर सांगितले.

