इसापूर येथे रस्त्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण उपोषणाचा तिसरा दिवस
प्रशासन अजून झोपेचं सोंग घेत आहे.
✍️समाधान कांबळे (पुसद माहूर प्रतिनिधी)

उमरखेड (दिनांक २३ एप्रिल) ईसापूर रस्त्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाअध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, सर्कलप्रमुख सर्जेराव मस्के (शेंबाळपिंपरी) व ईसापूर ग्रामस्थ कासम खान यांनी सोमवारपासून (ता. २१) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ईसापूर-शेंबाळपिंपरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष आणि खोट्या आश्वासनांना विरोध म्हणून २/४/२०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी व गावकऱ्यांनी मिळून शासनाला अमर कुपोषणाचे निवेदन दिले होते.
शासनाने निवेदनाची दखल न घेतल्यामुळे दिनांक २१/४/२०२५ रोजी.उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.


या उपोषणाला पोलिस पाटील विश्वदीप थोरात, सरपंच आमजत खान संमत खान, उपसरपंच भास्कर थोरात, माजी पोलिस पाटील सुदाम खडसे, विलास डंगाले यांनी पाठिंबा दिला आहे.

अविनाश थोरात संदीप आढाव, अनमोल ढोले, दत्ता काळे, शशांक खंदारे, भगवान जाधव, मुकिंदा थोरात, प्रकाश बैस, संदीप नाईक, परसराम थोरात, संघपाल कांबळे, हाशू खा पठाण, रवींद्र थोरात, शिलानंद थोरात आदी कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी ठाण मांडले आहे.

रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असाही इशारा गावकऱ्यांनी व वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
