उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकियसामाजिक

आमदार किसनराव वानखेडे यांनी विधानसभा मतदार संघाच्या ज्वलंत समस्यांकडे वेधले सभागृहाचे लक्ष

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड : – विधानसभेत अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान उमरखेड – महागाव विधानसभा मतदार संघातील ज्वलंत मागण्यांसंदर्भात विकासकामांचे मुद्दे मांडून आमदार किसनराव वानखेडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

यामध्ये विधानसभा मतदारसंघातील महागाव येथे सध्या पोलीस स्टेशनची इमारत व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधा आवश्यक आहेत. त्यामुळे येथे नवीन पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहत उभारण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी ,उमरखेड–महागाव विधानसभा मतदारसंघातील रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकासाठी पीक पाहणी अ‍ॅपवरील नोंदणीची मुदत संपलेली आहे. अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक पाहणी अ‍ॅपवरील नोंदणीस मुदतवाढ देण्यात यावी ,ईसापुर डावा कालवा ० ते १५ किमीपर्यंत कालवा दुरुस्ती व बांधकाम दुरुस्ती करिता निधी उपलब्ध झाला आहे. तथापि १६ ते ५४ किमी दरम्यानचा कालवा अत्यंत नादुरुस्त अवस्थेत असून त्याची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे.

त्यामुळे कालवा दुरुस्ती व बांधकाम दुरुस्ती या कामासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात यावा ,सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून पैनगंगा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे परिसरातील वन्यप्राणी, गाई-ढोरे तसेच इतर पाळीव प्राण्यांसाठी व नदी तिरावरील गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर पैनगंगा नदीमध्ये आवश्यक तेवढे पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी ,देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी व बोरी या गावामधील शेतकरी बांधवांना मागील वर्षी कालवा नादुरुस्त असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती ला पाणी मिळु शकले नाही. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती करावी.

Oplus_131072

इसापूर डावा कालव्या मध्ये व नदी पात्रात पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, जेणे करून वन्यप्राणी, पाळीव प्राणी, गुरेढोरे व नदी तिरावरील गावांना पाणी पिण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनासाठी योग्य वेळी पाणी मिळू शकेल व शेतकर्याचा ऊसाचा एकही धांडा वाळणार नाही , यासहउमरखेड–महागाव विधानसभा मतदारसंघात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी नवीन उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी किमान १००० कोटींच्या विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, ज्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील व परिसराचा आर्थिक विकास होईल.

अशा विविध ज्वलंत समस्यांचा पाढा आमदार वानखेडे यांनीअर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यावरील चर्चेदरम्यान विधानसभेत मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!