विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी प्राथमिक सदस्यत्व रद्द!
✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

यवतमाळ – जिल्हा विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी वेळेवर अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीसह काँग्रेस पक्षाला फार मोठा धोका दिला .


त्याबाबत जिल्हा अध्यक्ष एडवोकेट सचिन नाईक यांनी केलेल्या तक्रारीची दखल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली असून त्यांना पक्षातून निलंबित करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे वास्तविक निलंबित केल्यानंतर सदस्यत्व रद्द करण्याचा प्रश्न येत नाही निलंबन वेगळा विषय आहे त्यांचे सदस्यत्व रद्द करायचे असते तर त्यांना पार्टीतून निष्काशीत म्हणजे प्रत्यक्षात त्यांची हाकलपट्टी करायला पाहिजे होती.

परंतु सदर पत्रामध्ये त्यांना निलंबित केले व सदस्यत्व रद्द केले हे असे विरोधाभास निर्माण करणारे शब्द आहेत असो सदस्यत्व रद्द करणे म्हणजे काँग्रेस पक्षश्रेष्ठीने साहेबराव कांबळे यांना अखेर पक्षातून हद्दपार केले आहे.



