अर्थसंकल्प हा शेतकरी, शेतमजूर, बेरोजगाराना रोजगार देणारा, बेघराना घरे, जनसामान्यांचे जीवनमान उंचावणारा -नितीनभाऊ भुतडा
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

यवतमाळ (दिनांक 10 मार्च) सण 2025 चा अर्थसंकल्प हा शेतकरी, शेतमजूर, बेरोजगाराना रोजगार देणारा, बेघराना घरे, जनसामान्यांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प आहे.

सदर अर्थसंकल्पातून नक्षलवादी जिल्हा म्हणून दहशतीत वावरणारा गडचिरोली जिल्हा आता हजारो कोटींच्या निधी अंतर्गत स्टील हब होणार व तेथील लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

कोट्यवधींच्या निधीसह कालवे वितरण प्रणालीची कामे मंजूर करून राज्यातील शेतकऱ्यांचा आत्मसन्मान राखण्यात येत आहे.

शेतीपूरक पशुसंवर्धन दुग्धविकास व्यवसायास चालना देण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधीची तरतुद करण्यात आली.
राज्य सरकारच्या अखत्यारीतील विविध योजनेच्या 44 लाख 7 हजार घरकुलाना मंजुरी देऊन निरंआश्रिताना आश्रय, निराधाराणा आधार मिळणार आहे.

आरोग्य व जेष्ठनागरिक धोरण ही विचाराधीन असल्याने एकंदरीत राज्यातील सर्वच क्षेत्रासाठी समतोल साधणारा सर्वसामावेशक असा अर्थसंकल्प महायुती सरकार कडून आज जनतेच्या चरणी अर्पित करण्यात आला आहे.

अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना नितीनभाऊ भुतडा (भाजपा-यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक तथा पश्चिम विदर्भ प्रमुख सदस्यता नोंदणी अभियान) यांनी दिली आहे.
