उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ ‘ढाणकी शहर’ कडकडीत बंद! वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद; व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने ठेवली बंद


✍️करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)


दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या देशातील विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारच्या पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज ढाणकी शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या आवाहनाला प्रतिसाद देत ढाणकी शहरातील नागरिक, व्यापारी आणि विविध संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

आज सकाळपासूनच ढाणकी शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी दुकाने, सर्व प्रकारची प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. केंद्र सरकारच्या दडपशाही आणि हुकूमशाही वृत्तीविरुद्ध तीव्र असंतोष व्यक्त करत सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या निषेध आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांततापूर्ण वातावरणात बंद पाळण्यात आला.

या बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने कालच बिटारगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना अधिकृत निवेदन सादर करून घटनेचा तीव्र निषेध नोंदवला होता. दि. २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.

या बंद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसह तालुक्यातील विविध समविचारी पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, संबोधी गायकवाड (तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) काँग्रेस शहराध्यक्ष गजानन मिटकरे, राजेश घुगरे ,विश्वास धुळे, संतोष गायकवाड , राजू पाटील ,ऋषीं कवडे ,गोपीनाथ नरवाडे, योगेश गायकवाड, तुकाराम इंगोले, यशवंत खिल्लारे, शंकर गायकवाड, शावलाजी इंगोले, साहेबराव गायकवाड ,सतीश मुनेश्वर, विकास नरवाडे ,रामजी गायकवाड, आकाश गायकवाड ,समाधान नरवाडे, संतोष कुलदीपके, शुभम नरवाडे, कृष्णा कानिदे ,यश गायकवाड, अनिकेत सातपाटे आदित्य कानिदे गोलू गायकवाड व विद्यार्थी इतर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button