दुकानात “घेतलेला माल परत होणार नाही” असे बोर्ड लावणे बेकायदेशीर!
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

📢 दुकानात ‘हा’ बोर्ड दिसल्यास सावधान! अनेकदा आपण दुकानांमध्ये गेल्यानंतर तिथे एक ठळक पाटी किंवा बोर्ड वाचतो: “एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही अथवा बदलून दिला जाणार नाही.” काही ठिकाणी तर अगदी मजेशीर किंवा कडक शब्दात “आईला, बाबाला, बायकोला पसंत नाही अशी कारणे चालणार नाहीत”असेही लिहिलेले आढळते. पण ग्राहक म्हणून तुम्हाला माहिती आहे का? दुकानदारांची ही मनमानी पूर्णपणे बेकायदेशीर आहे!


⚖️ काय सांगतो कायदा? ग्राहक संरक्षण कायदा, 2019 (Consumer Protection Act, 2019) अन्वये, भारतातील कोणत्याही दुकानदाराला किंवा व्यवसायिकाला “परतावा नाही, बदल नाही” (No Return / No Exchange) असे धोरण ग्राहकांवर सक्तीने लादण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. जर ग्राहकाला मिळालेली वस्तू सदोष, निकृष्ट दर्जाची किंवा आश्वासनाप्रमाणे नसेल, तर ती वस्तू बदलून मिळवणे किंवा पैसे परत मिळवणे हा ग्राहकाचा कायदेशीर हक्क आहे. अशा पद्धतीचे फलक लावणे ग्राहकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासारखे असून, तो कायद्यानुसार ‘अवाजवी व्यापार सराव’ (Unfair Trade Practice) मानला जातो. 📞 तक्रार कुठे आणि कशी करावी?

जर एखादा दुकानदार सदोष माल परत घेण्यास नकार देत असेल किंवा अशा पाट्या लावून ग्राहकांची दिशाभूल करत असेल, तर तुम्ही थेट खालील क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता:📌राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (National Consumer Helpline):📞 1915 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार सहज नोंदवू शकता.




