अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238
मानवत (दिनांक ०४ जानेवारी) अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन मानवत पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी बालासाहेब मारोतराव सत्वधर वय ५८ पोलिस पाटील झरी. ता पाथरी यांनी मानवत पोलिस स्टेशन येथे खबर दिली. मागील सुमारे आठ दिवसांपासुन झरी या गावात एक अनोळखी वयोवृध्द पुरुष वय वर्ष अंदाजे ७० हा गावात आला हाता तो गावात भिक मागुन खात होता तो कोणाला त्रास देत नव्हता तो मंदीरा जवळ झोपत होता दि ०१.०१.२०२५ रोजी रात्री ०९. ३० वा. सदर अनोळखी इसम हा जगनाथ सत्वधर यांचे जनावराचे आखाड्यावर काही एक हाल चाल करीत नसल्याने दिसून आले या सबंधी मानवत पोलीसांना माहीती दिली.

सदर इसमास मानवत येथे रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले.
सदरील प्रकरणी पोलिस ठाणे मानवत येथे आकस्मिक मृत्यू क्रमांक ०१/२०२५ चे कलम १९४ भारतीय नागरीक सुरक्षा संहीता प्रमाणे नोंद करण्यात आली असून सदरील व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास मानवत पोलिस स्टेशन येथे संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

अनोळखी मयताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. वय अंदाजे ७० वर्षे, रंग काळा सावळा, केस संपुर्ण पांढरे अर्धे टक्क्कल, दाढी वाढलेले संपुर्ण पांढरी, अंगात चॉकलेटी रंगाचे फुल बाह्याचे शर्ट, काळी पँट, चॉकलेटी रंगाची फाटलेली अंडरवे अर असे वर्णन असून वरील वर्णनाचे अनोळखी इसमाचे ओळख पटविण्यासाठी मानवत पोलीसांना संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
